Vidya Pratishthan supe Art, Science & Commerce college supe
Thursday, February 28, 2019
विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा आज दि.२८/२/२०१९ रोजी पार पडला.यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पानी फाउंडेशन चे बारामती तालुका समन्वयक मा.श्री मयुर साळूंखे सर उपस्थित होते, अध्यक्ष स्थानी प्रा.डॉ.राहुल पाटील सर या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला.तसेच दि.१८ ते २० मे २०१८ या दरम्यान जळगाव सुपे येथे पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर नांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ दिवसीय श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या सहभागाबद्दल आज दि.२८/०२/२०१९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये पानी फाउंडेशनने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला गौरव जलरत्नांचा हे सम्मान पत्र देऊन गौरविले....💐💐💐💧💧💦💦

Tuesday, September 4, 2018
सुपे महाविद्यालयाच्या वतीने केरळ पुरग्रस्तांसाठी मदतनिधीफेरीचे आयोजन
........…..…...........................
सुपे,मंगळवार,दि.४ सप्टेंबर २०१८
येथिल विद्या प्रतिष्ठान संचलित सुपे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने केरळ पुरग्रस्तांसाठी सुपे गावात मदतनिधी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.हे आयोजन महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजना' व 'विद्यार्थी विकास मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सुपे गावातील मुख्य बाजारपेठ व बाजार समिती परिसरात काढण्यात आलेल्या या मदतनिधी फेरीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच रा.से.यो.स्वयंसेवक उस्फुर्तपणे सहभागी झाले.या वेळी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी सढळ हाताने मदत करून महाविद्यालयाच्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले.यामधून सुमारे ११ हजार रुपयांची मदत जमा झाली. सदर रक्कम सा.फु. पुणे विद्यापीठाच्या 'कुलगुरू पूरग्रस्त मदतनिधी फंड' या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
या प्रसंगी उपस्थित असलेले रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर नांदगुडे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सुनिल भिसे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख प्रा.दत्तात्रय जगताप व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.मारुती भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Subscribe to:
Posts (Atom)